भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी उपोषणाचा ईशारा

बातमी शेअर करा...

भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी उपोषणाचा ईशारा
अशोक परदेशी यांचे सार्वजनिक विभागाला निवेदन

भडगाव प्रतिनिधी

भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या मागणीचे निवेदन अशोक परदेशी यांनी भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. तात्काळ या रस्त्यावरील खड्डयांच्या डागडुजीचे काम करण्यात यावे. रस्ता वापरण्यास सोयीचा करावा.अन्यथा भडगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसण्यास येईल. असाही निवेदनात ईशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागालि दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,भडगाव ते वाडे या रस्त्यावर ठिक ठिकाणी छोटया मोठया खड्डयांचे मोठया प्रमाणात जाळे पसरलेले आहे. भडगाव ते कोठली, कोठली ते कनाशी, गोंडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्यावर पाऊसाच्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मोठया ञासाचे ठरतांना दिसत आहे.वाहने पंक्चर होणे, वाहनांचे छोटे अपघात होतांना दिसत आहेत.वाहनधारकांना वाहने चालविणे मोठया ञासाचे ठरतांना दिसत आहे. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. वाहनधारक संतप्त झाले आहेत.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने भडगाव ते वाडे रस्त्याच्या खड्डयांची डागडुजीचे काम करुन रस्ता वापरण्यास सोयीचा करावा. अन्यथा भडगाव तहसिल कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणास बसण्यात येईल. असेही शेवटी निवेदनात नमुद केलेले आहे. या निवेदनावर अशोक परदेशी यांची सही आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम