
भडगाव माळी पंच मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
मुकुंदा महाजन यांची अध्यक्ष, तर प्रा. राजेंद्र महाजन व ॲड. विजय महाजन यांची उपाध्यक्षपदी निवड
भडगाव माळी पंच मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
मुकुंदा महाजन यांची अध्यक्ष, तर प्रा. राजेंद्र महाजन व ॲड. विजय महाजन यांची उपाध्यक्षपदी निवड
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव माळी पंच मंडळाची बैठक बुधवार, १० जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजबांधव आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन होते. बैठकीत पंच मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, २३ जुलै रोजी संत सावता महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत मुकुंदा महाजन यांची अध्यक्ष, तर प्रा. राजेंद्र महाजन व ॲड. विजय महाजन यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शुभम शालीग्राम माळी हे खजिनदार, तर सदस्य म्हणून ओम अविनाश माळी, मनोज उत्तम महाजन, विजय धाकलू महाजन, गोविंद लोटन महाजन, देवराम निंबा महाजन, जीवन तुकाराम महाजन, दत्तामय अभिमन महाजन, रमेश एकनाथ महाजन, विजय सिताराम महाजन आणि मनोज युवराज देशमुख यांची निवड करण्यात आली.
संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त २३ जुलै रोजी रथमार्गाने प्रतिमा मिरवणूक, त्यानंतर गुणगौरव आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भडगाव शहरात समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.
बैठकीस विनोद महाजन, गणेश माळी, आप्पा महाजन, अशोक महाजन, दत्तात्रय महाजन, अनिल महाजन, रमेश महाजन, नितीन महाजन, सागर महाजन, बबलू महाजन, शेनपडू महाजन आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम