
भडगाव येथे प्रतापराव पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
भडगाव येथे प्रतापराव पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी भव्य रक्तदान शिबिर ; विद्यार्थ्यांसाठी वही तुला
भातखंडे (प्रतिनिधी) कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांच्या ६९ वा वाढदिवस भडगाव येथील आदित्य लॉन्स मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय विनायकराव पाटील हे होते. तर व्यासपीठावर मंत्रालयातील अवर सचिव प्रशांतराव पाटील, दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनमताई पाटील, शिवाजीराव पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, माध्यमिक सोसायटी चे संचालक जगदीश भोसले, भैय्यासाहेब भोसले, सुभाष पाटील, देवीदास पाटील आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या वतीने प्रतापराव पाटील यांची वही तुला करण्यात आली. गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या वहींचे वाटप करण्यात येणार आहे. नंतर कौटूंबिक औक्षण करण्यात आले. प्रास्ताविक लाडकुबाई विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली शिंदे यांनी केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर पूनम ताई प्रशांतराव पाटील यांनी यांनी वाढदिवस प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले मनोगतातून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. व ३० सप्टेंबर रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहाच्या सांगता कार्यक्रम आमडदे येथे उपस्थितीचे आवाहन केले. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदे यांनी प्रतापराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुका या नानासाहेबांच्या नेतृत्वात लढवल्या जातील याचे सुतोवाच दिले आणि भडगाव तालुक्यातील संपूर्ण निर्णय नानासाहेबच घेतील असे सांगितले. गिरड चे शिवाजीराव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे, पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी यांच्या सह विविध गावांचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन दूध संघाचे चेअरमन व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक अभिष्टचिंतनासाठी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद -.
यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा व संस्थेच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यावेळी २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी श्री साई सेवा मेडिकल फाउंडेशन संचलित निर्णय जनसेवा ब्लड बँक धुळे यांचे सहकार्य लाभले. या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व तीन लिटर पाण्याचा जार यावेळी प्रोत्साहन म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले. वाढदिवस अभिष्टचिंतनाचा या कार्यक्रमासाठी किसान शिक्षण संस्थेचे सर्व शाखांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक, कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम