भरदिवसा घरातून ६३ हजार रुपयांचे दागिने लंपास

बातमी शेअर करा...

भरदिवसा घरातून ६३ हजार रुपयांचे दागिने लंपास

 

 

टी.एम. नगरमधील उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

 

जळगाव: शहरातील टी.एम. नगरातील उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंकज शंकरलाल तोलानी (वय ३५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना, चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच पंकज तोलानी यांनी बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार विजयसिंग पाटील करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांनी तातडीने चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम