भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील घटना

जळगाव : भरधाव कारने दुचाकीस्वार प्रौढाला जोरदार धडक दिली. या अपघातात दिवानसिंग पाटील हे गंभीर जखमी होवून त्यांचे वाहनाचे नुकसान झाले. ही घटना दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास रामानंद नगर चर्चजवळ घडली.

याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हरिविठ्ठल नगरातील राजपूत कॉलनीत चेतन दिवानसिंग पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास त्याचे वडील (एमएच १९, ईएफ १५७३) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे येत होते. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९, ९०७९) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दिवानसिंग पाटील हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, कारचालक हा कोणतीही मदत न करता तेथून पळून गेला होता. चेतन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम