भरधाव ट्रकच्या धडकेत विवाहितेसह सात महिन्यांची मुलगी ठार

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळील घटना

बातमी शेअर करा...

भरधाव ट्रकच्या धडकेत विवाहितेसह सात महिन्यांची मुलगी ठार
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळील घटना
शिंदखेडा प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव आयशर ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याने विवाहितेसह तिची सात महिन्यांची मुलगी ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला आहे.

आयशर (एम.एच.12 यु.एम.0500) ने मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे फाट्याजवळ दुचाकी (एम.पी.49 एनई 4099)ला जोरदार धडक दिली. या अपघातात बबलीबाई संतोषनाथ भाटी (29) आणि त्यांची सात महिन्यांची मुलगी तनया यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोषनाथ बाबूनाथ भाटी (23) हे गंभीरपणे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघाताच्या संदर्भात संतोषनाथ यांच्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिसांनी आयशर ट्रक चालक पोपट आप्पा भाटकर (45, बारामती, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम