भरधाव ट्रकने दुचाकीला धडक; महंत प्रियरंजनदास यांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा...

एरंडोल: एरंडोलजवळ गुरुवारी सायंकाळी भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पिंपरी बुद्रुक येथील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे सहकारी प्रवीण नारायण पाटील (वय २३) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ महामार्ग रोखून धरला. त्यांनी प्रशासनाकडे गावातून जाणाऱ्या महामार्गावर समांतर रस्ता आणि गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी केली. या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

प्रशासनाची धावपळ आणि समजूत अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील आणि एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने समांतर रस्ता आणि गतिरोधक बसवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम