भरधाव डंपरखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा...

भरधाव डंपरखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

जामनेर:- तालुक्यातील नेरी येथे एका भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.

नेरी येथील शिवाजी पुतळ्याजवळ डंपर क्रमांक एमएच २८-९१८५ च्या चालकाने गजानन पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन पाटील गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक आकाश भरत राजपूत घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला वावडदा येथून अटक केली. पोलिसांनी डंपरही ताब्यात घेतला असून, तो अपघातवेळी रिकामा असल्याचे सांगितले.

या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. डंपरद्वारे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अवैध वाहतुकीमुळे असे अपघात घडत असून, प्रशासनाने यावर वेळीच नियंत्रण आणण्याची मागणी त्यांनी केली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम