भरधाव वाहनाची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा...

भरधाव वाहनाची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी
शहरातील ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२५ मे) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. प्रेम धीरज ठाकुर (वय २०, रा. शिंदे नगर, पिंप्राळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रेम ठाकुर हा शिंदे नगर, पिंप्राळा येथे कुटुंबासह राहत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. रविवारी रात्री तो दुचाकीवरून ईच्छादेवीकडून अजिंठा चौफुलीकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की, प्रेमचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती विठ्ठल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला. वैद्यकीय तपासणीनंतर प्रेम ठाकुरला मृत घोषित करण्यात आले.

प्रेमच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम