भरधाव अज्ञात वाहनाची जोरदार धडक, वृद्धाचा मृत्यू

दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना

बातमी शेअर करा...

भरधाव अज्ञात वाहनाची जोरदार धडक, वृद्धाचा मृत्यू
दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना

वरणगाव I

अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या भीमराव इंगळे (वय- ७४) रा.दर्यापूर शिवार, वरणगाव ता. भुसावळ यांचा मृत्यू झाल्याची घटना दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर १० जानेवारी शुक्रवार रोजी रात्री ८ वाजता घडली.

भीमराव इंगळे हे शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर पायी जात होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या धडकेत भीमराव इंगळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी ११ जानेवारी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम