
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक हजार रोपांचे वाटप
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक हजार रोपांचे वाटप
जळगाव दि. ७ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली होती. वृक्षसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या दिवशी एका परिवारास एक रोप याप्रमाणे वाटप करण्यात आले. सजीव बल्लाळेश्वर तयार केलेल्या रोपांचे वाटप प्रसाद स्वरूपात घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. कुंड्यांसकट एक हजार रोपांचे वाटप केले गेले. यावेळी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मंगलसिंग राठोड, देवेंद्र पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम