भविष्यासाठी सज्ज पिढी घडविण्याकडे एक पाऊल…

बातमी शेअर करा...

भविष्यासाठी सज्ज पिढी घडविण्याकडे एक पाऊल…

एस.डी.-सीडच्या माध्यमातून एआय प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने एस.डी.-सीड (सुरेशदादा जैन शैक्षणिक व उद्योजकता विकास योजना) कडून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव येथे ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी तथा एस.डी.-सीडचे मार्गदर्शक निलकंठ गायकवाड सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.डी.-सीड गव्हर्निंग बोर्डचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रा. डी. टी. नेहते, पर्यवेक्षक सी. एस. चौधरी, ज्युनिअर कॉलेज प्रमुख संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक संजीव चौधरी व सौ. प्रियांका हर्षवर्धन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ChatGPT तसेच आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी प्रभावी वापर कसा करता येईल, याचे सविस्तर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. एआय म्हणजे नेमके काय, त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोग, अभ्यास, गृहपाठ, प्रकल्प, परीक्षेची तयारी, स्वयं-अभ्यास, करिअर मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्यासाठी एआय कसा उपयुक्त ठरू शकतो, याबाबत सोप्या मराठी भाषेत माहिती देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी एआयचा वापर जबाबदारीने व सकारात्मक पद्धतीने कसा करावा, यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेतील संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला, तर शिक्षकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. एआयच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवून आत्म-सशक्तीकरण कसे साधता येईल, याचा प्रभावी संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.

कार्यक्रमास इयत्ता दहावी ते बारावीचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी सर्वांचे आभार गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम