भव्य ग्रंथ दिंडी आणि सांस्कृतिक सोहळ्याने अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात

ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले

बातमी शेअर करा...

भव्य ग्रंथ दिंडी आणि सांस्कृतिक सोहळ्याने अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात

ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले

अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेशातील समृद्ध अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात बळीराजा स्मारकाचे पूजन करून भव्य ग्रंथ दिंडी आणि सांस्कृतिक सोहळ्याने झाली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी) येथे या दिंडीची सांगता झाली.

बळीराजा स्मारकापासून निघालेल्या या दिंडीमध्ये कानबाईची वारी, तगतराव, विठोबाची वारी, ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. “आथानी कैरी, तथानी कैरी…कैरी झोका खाय वं…” यासारख्या अहिराणी आणि आदिवासी लोकगीतांवर उपस्थितांनी ठेका धरत सोहळ्याची रंगत वाढवली.

या प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, डी. डी. पाटील, के. डी. पाटील, साने गुरुजी महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, समन्वयक डि. ए. पाटील, बापूराव ठाकरे, मेघा पाटील, वैशाली शेवाळे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, अर्चना राजपूत, बाळासाहेब भदाणे, डॉ. रमेश सूर्यवंशी, निलेश पाटील, प्रा. अशोक पवार, रणजीत शिंदे, प्रा. लिलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम