भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण
अमळनेर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण
अमळनेर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा
अमळनेर I प्रतिनिधी
मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला एकाने तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना अमळनेर शहरातील प्रताप कॉलेज समोर १० जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ जानेवारी रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जतीन भटू पाटील हा तरूण आपल्या परिवारासह राहायला असून १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयासमोर जतीन हा मित्र कल्पेश विजय खैरनार याला घेण्यासाठी दुचाकीने गेला होता. त्यावेळी महाविद्यालयाच्या समोर कल्पेश खैरनार याचे राधे लखन जाधव रा. झामी चौक, अमळनेर याच्या सोबत भांडण सुरू होते. त्यावेळी जतीन पाटील हा दुचाकी थांबवून मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेला. याचा राग आल्याने राधे जाधव याने शिवीगाळ करत जतीन याला बेदम मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जतीनची आई भाविता पाटील यांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा राधे जाधव याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम