भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारींची घोषणा

बातमी शेअर करा...

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारींची घोषणा

फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती ;  जळगाव जिल्ह्याची जबाबदारी ना.संजय सावकारेंवर

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष – महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

जाहीर करण्यात आलेल्या यादीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार तर प्रभारी नितेश राणे असतील. रत्नागिरी उत्तरचा कारभार विनय नातू व प्रभारी निरंजन डावखरे यांच्याकडे, तर रत्नागिरी दक्षिणचे प्रमुख अतुल काळसेकर आणि प्रभारी म्हणून रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तरचे प्रभारी प्रशांत ठाकूर, रायगड दक्षिणचे सतिश धारप, ठाणे शहराचे प्रमुख संजय केळकर, तर ठाणे ग्रामीणचे प्रमुख कपिल पाटील असतील.

भिवंडीच्या जबाबदारीसाठी महेश चौघुले, मीरा-भाईंदरसाठी नरेंद्र मेहता व प्रभारी गणेश नाईक, नवी मुंबईसाठी संजीव नाईक, कल्याणसाठी नाना सूर्यवंशी, उल्हासनगरसाठी प्रदीप रामचंदानी, वसई-विरारसाठी राजन नाईक व प्रभारी डॉ. हेमंत सावरा, पालघर जिल्ह्यासाठी बाबाजी काठोळे, नंदुरबारसाठी विजय चौधरी व प्रभारी रक्षा खडसे, तर धुळे शहराचे प्रमुख अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील व प्रभारी जयकुमार रावल अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक शहराचे प्रमुख राहुल ढिकले, नाशिक उत्तरचे डॉ. राहुल आहेर, नाशिक दक्षिणचे गिरीश पालवे व प्रभारी गिरीश महाजन, मालेगावचे प्रमुख दादा जाधव, जळगाव शहराचे प्रमुख राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) चे नंदू महाजन व प्रभारी संजय सावकारे, जळगाव पश्चिमचे प्रमुख मंगेश चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर शहराचे प्रमुख विक्रम पाचपुते, अहिल्यानगर उत्तरच्या प्रमुख नेहलता कोल्हे व प्रभारी राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर दक्षिणचे प्रमुख सुजय विखे पाटील, पुणे शहराचे रघुनाथ कुलकर्णी, पुणे उत्तर (मावळ) चे राम सातपुते, पुणे दक्षिण (बारामती) चे सचिन कल्याणशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे धैर्यशील कदम, सोलापूर शहराचे जयकुमार गोरे, सोलापूर पूर्वचे राम सातपुते, सोलापूर पश्चिम (माढा) चे सोनल कल्याणशेट्टी आणि साताऱ्याचे प्रभारी शिवेंद्रराजे भोसले यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या नियुक्त्यांमुळे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा रणसंग्राम प्रभावीपणे उभारण्यास सुरुवात केली असून प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक समन्वय व रणनीती यासाठी स्वतंत्र जबाबदार नेते नेमले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम