भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी

बातमी शेअर करा...

भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी
मुंबई I वृत्तसंस्था

माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे रविवारी होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, त्यांना फडणवीस मंत्रिमंडळात संधी न देता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचे संकेत देण्यात आले होते. नजीकच्या काळात ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रे स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले. तूर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम