
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद
५.५ लाख नागरिकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद
५.५ लाख नागरिकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५.५ लाख नागरिकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे, अशी माहिती भाजप प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार अमोल जावळे, महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, तसेच राधेश्याम चौधरी, नंदू महाजन, अरविंद देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव शहरातील विविध बूथ केंद्रांवर ५ हजारांहून अधिक नागरिकांनी सक्रिय सदस्यत्व स्वीकारले आहे, यामुळे शहरातील संघटन अधिक बळकट झाल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, या अभियानात महिलांचा सहभाग तब्बल ६० टक्के असून पुरुष सदस्यत्व ४० टक्के आहे. महिलांचा वाढता सहभाग पक्षासाठी उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये एकत्रित राबवण्यात आलेल्या अभियानात २४ लाख सदस्य ऑनलाइन आणि १ लाख सदस्य ऑफलाइन पद्धतीने नोंदले गेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील १७६ मंडळांवर विविध संघटनात्मक उपक्रम आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. नागरिकांनी दाखवलेला आत्मीय प्रतिसाद आणि विश्वास भाजपच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक ठरला आहे.
६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोर कमळाची रांगोळी काढावी, असे आवाहन विजयराव चौधरी यांनी यावेळी केले.
याशिवाय, संघटनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थापना दिन साजरा केला जाणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम