भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीतर्फे मंगळ ग्रह मंदिरा पासून सदस्य नोंदणीस प्रारंभ

निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न

बातमी शेअर करा...

भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीतर्फे मंगळ ग्रह मंदिरा पासून सदस्य नोंदणीस प्रारंभ
निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न
अमळनेर प्रतिनिधी

येथील खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पश्चिम जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते मंगळ ग्रह मंदिर परिसरात सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला.भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी देशभर सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ (पलांडे) ,शहराध्यक्ष विजय राजपुत, दिलीप ठाकुर, शिवाजी राजपुत ,देवा लांडगे ,सौरभ पाटील ,किरण बोरसे ,सागर वाघ ,सुभाष पाटील ,प्रा.जयवंत पटवर्धन यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघात जास्तीतजास्त या अभियाना अंतर्गत सद्स्य नोंदणी करण्याचा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी मानस व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम