
भाजपा मंगरूळनाथ तालुका कार्यकारिणी जाहीर; आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण
भाजपा मंगरूळनाथ तालुका कार्यकारिणी जाहीर; आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण
शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) – वार्ताहर श्याम अपूर्वा
भाजपा तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील धोटे यांनी विविध स्तरांवरून पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जाहीर केलेल्या नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीचे नियुक्ती सन्मानपत्र वितरण सोहळा मंगरूळनाथ येथील केमिस्ट्री भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात मंगरूळनाथ-वाशिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामभाऊ खोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे, माजी जिल्हा परिषद सभापती सुरेशभाऊ लुंगे, भाजपा शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, विनोदभाऊ जाधव, जिल्हा चिटणीस डॉ. संजय राऊत, सुनिलभाऊ मालपाणी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगादिप राऊत, पं.स. सदस्य अतुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्रांचे वितरण झाले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
-
तालुका उपाध्यक्ष – नंदुभाऊ भुजाडे, सतिश पाटील राऊत, किशोर पाटील सावके, अनिल काटकर, गोपालराव जायभाये, सौ. ज्योती गायकवाड
-
सरचिटणीस – महादेव विश्वकर्मा, चंद्रकांत गहुले
-
चिटणीस – श्रीराम टोपले, सुरेश घुगे, सौ. राधाताई वानखेडे
-
कोषाध्यक्ष – अतुलभाऊ दशरथ पाचे
-
सदस्य – भारतभाऊ कोंगे, गणेश सावके, महेश गुप्ता, अनिल ठाकरे, अंबादास परंडे, अरुणभाऊ घुगे, श्याम कराळे, रोशन कोसे, योगेश इंगळे, नंदू खराबे, गोपाल वानखडे
विविध मोर्चा व आघाडी अध्यक्ष :
-
युवा मोर्चा तालुका अध्यक्ष – शिव ओम व्यवहारे
-
किसान मोर्चा अध्यक्ष – राजेश बारड
-
व्यापारी आघाडी अध्यक्ष – अनिलभाऊ गोठी
-
सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख – श्यामभाऊ अपूर्वा
-
ओबीसी मोर्चा अध्यक्ष – निवासराव घुगे
-
अनुसूचित जाती अध्यक्ष – विशाल खंडारे
-
अनुसूचित जमाती अध्यक्ष – शैलेशजी मोरे
-
अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष – महेबुब खान रशिदखान
-
ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष – मुकुंदराव जायभाये
आमदार श्यामभाऊ खोडे यांचे मार्गदर्शन :
यावेळी आमदार श्याम खोडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना “प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या विचारधारेने कार्य करण्याचे आवाहन केले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठेने काम करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमामुळे तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात भाजपा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम