भाजपा सावदा मंडळात स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांचा ऑनलाईन संवाद

बातमी शेअर करा...

भाजपा सावदा मंडळात स्थापना दिवस उत्साहात साजरा
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांचा ऑनलाईन संवाद

सावदा (प्रतिनिधी) – नवविकसित भाजपा सावदा मंडळाच्या वतीने ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा ४४ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात भारत माता आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूजनाने झाली. यानंतर राजश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदनपूर्वक पार पाडला.

दुपारी झालेल्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदस्य नोंदणी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि आगामी निवडणुकांत नव्या जोमाने विजय मिळवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका अध्यक्ष महेश चौधरी, जिल्हा चिटणीस रेखा बोंडे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष संजय माळी, लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, तालुका सरचिटणीस दुर्गादास पाटील, सावदा शहराध्यक्ष जे. के. भारंबे, तालुका उपाध्यक्ष सचिन बऱ्हाटे, माजी नगरसेविका नंदाबाई लोखंडे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम