भाजप ओबीसी मोर्चातर्फे शिरपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण

बातमी शेअर करा...

भाजप ओबीसी मोर्चातर्फे शिरपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण
शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली महाज्योती टॅब वितरण योजनेचा शिरपूरमध्ये यशस्वी उपक्रम

शिरपूर (प्रतिनिधी) – भाजप ओबीसी मोर्चातर्फे व प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथील संताजी चौक, चौधरी गल्ली येथे ‘महाज्योती फ्री टॅब’ योजनेसाठी मोफत ऑनलाईन नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला शिरपूर परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल १०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून आपली नोंदणी पूर्ण केली.

सन २०२५ मध्ये इयत्ता १०वी उत्तीर्ण होऊन ११वी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि नॉन क्रिमिलिअर गटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब वाटपाची योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन मा. उपनगराध्यक्ष व आर.सी. पटेल संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष बबनराव चौधरी होते.

आपल्या मनोगतात भंडारी व चौधरी यांनी शामकांत ईशी यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी ईशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवक आणि सामान्य जनतेला वेळोवेळी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

या वेळी डॉ. तुषार रंधे, देवेंद्र पाटील, दिलीप आप्पा लोहार, के. डी. पाटील, बाबूलाल माळी, आत्माराम माळी, चंद्रकांत माळी, रविंद्र माळी, अशोक कलाल, वासुदेव देवरे, राजेंद्र अग्रवाल, जतिनकुमार शाह, महंत सतिषदासजी भोंगे महाराज, प्रमोद भोंगे, वैभव भोंगे, नगरसेवक रजाक कुरेशी, इरफान मिर्झा, हर्षल गिरासे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

या शिबिरास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मोफत नोंदणीसाठी सचिन कुमावत, मयुर धनराज चौधरी, दीपक पावरा आणि मयुर ऐशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामकांत ईशी यांनी केले. सुत्रसंचालन नरेश चौधरी, तर आभार प्रदर्शन जितेंद्र सोनवणे यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. छायाताई ईशी, मयुर ऐशी, शेखर चौधरी, सुरेंद्र नेरकर, यश गोविंद चौधरी, निखिल चौधरी, कैलास चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रतीक ईशी, पराग पाटील, विजय चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

या शिबिराद्वारे शासनाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण उद्देश सफल झाला असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना सुविधा पुरवली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम