भारताने जगाला संगीत व कला या दोन बहुमूल्य देणगी दिल्या – ना. संजय सावकारे

बातमी शेअर करा...

भारताने जगाला संगीत व कला या दोन बहुमूल्य देणगी दिल्या – ना. संजय सावकारे

युवारंग युवक महोत्सवाचा उत्साहात समारोप

जळगाव प्रतिनिधी भारताने जगाला संगीत व कला या दोन बहुमूल्य देणगी दिल्या आहेत. युवारंग २०२५ मध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संगीत व कला या क्षेत्रात चांगले कर्तृत्व दाखविण्याची संधी गेल्या २५ वर्षापासनू विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या व दिव्यांग महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी केले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, अभिनेत्री केतकी माटेगावकर, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रा. सुनील कुलकर्णी, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, प्रा.सुरेखा पालवे, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, समन्वयक डॉ. संजय शेखावत उपस्थित होते.

युवकांना मार्गदर्शन करतांना मंत्री सावकारे पुढे म्हणाले की, स्वत: मोठे होत असतांना देशाचा प्रथम विचार करावा. आत्मविश्वास कायमस्वरुपी वाढवत ठेवावा. युवारंगातील आठवणींची शिदोरी विद्यार्थ्यांना आयुष्यभर कामात येईल असे सांगून विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पुढील गीत गायले.

तूम साथ न दे मेरा, चलना मुझे आता है ….

हर आग से वाकीफ हू, जलना मुझे आता है ….

इक प्यार का नगमा है ….

अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्यामधील जे जे टॅलेंट आहे त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा, अभ्यासाबरोबर आवड जपा. विश्वास दृढ राहू द्या तो यशस्वी व्यक्तींच्या एक टक्क्का यादीत तूम्हाला नेऊन ठेवेल. असे सांगून लवकरच स्टेजवर काम करायला मिळाल्याने महाविद्यालयीन आयुष्‍य जगता आले नाही मात्र आज युवारंग कार्यक्रमात मी अनुभव आहे असे सांगून जळगावच भरीत व शेवभाजी पसंत असल्याचे कथन केले. काक स्पर्श या चित्रपटाच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांचा अभ्यास केला.

अरे संसार संसार ही बहिणाबाईंची कविता गाता आली असे सांगून

मला वेड लागले प्रेमाचे… हे गीत गायले.

विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर टाईमपास चित्रपटातील

अरे हम गरीब हुए तो क्या हुआ.. दिले से अमीर है.. हे संवादवाक्य ऐकविले.

 

खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, युवारंग हे चांगले व्यासपीठ विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ला सिध्द करण्याची चांगली संधी आहे. यातून विद्यार्थ्यांना दिशा मिळते त्याचा वापर करुन चांगल्या क्षेत्रात यशस्वी व्हाव व आपल्या आयुष्याचा आलेख नेहमी चढता ठेवावा. देशामुळे आपले अस्तित्व आहे त्यामुळे जिथेही जाल तेथे देशाचा नावलौकीक वाढवावा असे आवाहन केले.

 

आमदार सुरेश भोळे यांनी युवारंगातून संस्कृती व संस्कार टिकविले जातात. शिक्षणासोबत कलागुण महत्वाचे असून त्यातूनही विद्यार्थ्यांना करीअर करता येते असे सांगून आई-वडील हे आपले आयडॉल माना. त्यांच्या इतके श्रम तूम्हाला घडविण्यात कोणीही घेतले नाही. त्यांच्या प्रती निष्ठा कायम राखा असे आवाहन करीत राष्ट्राप्रती कायम अग्रेसर रहा असेही सांगितले.

 

युवारंगचे स्वागाताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी जगातील इतर देशात जेन-झी चे वादळ नकारात्मक पायावर उभे आहे त्याउलट भारतातील तरुण पिढी रचनात्मक राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती मानत आहे. आपल्या देशाचा तेजस्वी इतिहास रचनात्मक आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्तीगतस्तरावर राष्ट्रभक्ती, पर्यावरण, महिला सन्मान, जातीभेद यांच्या घोषणा करुन नव्हे तर त्याबाबत सकारात्मक व रचनात्मक कार्य केले पाहिजे.

 

कार्याध्यक्ष नितीन झाल्टे यांनी युवारंग हा एकतेचा उत्साह व नवी दिशा देणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम देण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असे सांगून युवारंगातील विविध समिती सदस्य, महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.अग्रवाल, समन्वयक प्रा.शेखावत, स्वयंसेवक विद्यार्थी व रायसोनी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांनी परीश्रम करुन हा युवारंगचे आयोजन यशस्वी करुन दाखविल्याबददल आभार मानले.

 

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, कला अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. युवा महोत्सवात सहभागी कलावंतांनी सादर केलेल्या कला, शिस्त व खिलाडूवृत्तीचे कौतूक केले. तसेच दिव्यांग महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. यावर्षापासून सुरु करण्यात आलेल्या युवास्पार्क २०२५ च्या माध्यमातून नवीन संकल्पनांना व्यासपीठ मिळावे म्हणून सहभागी पहिल्या तिघांचा गौरव करण्यात आला. यातील पहिल्या १० संकल्पनांना विद्यापीठाच्या माध्यमातून इनक्युबेशन सहाय्य मोफत करणार आहे. गरज पडल्यास प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या युवक महोत्सवाची वंदेमातरम@१५० या थीमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनात राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाची भावना अशीच जागृत ठेवू या असे आवाहन केले.

 

आयोजक महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.प्रिती अग्रवाल यांनी युवारंग आयोजित करण्याची विद्यापीठाने दिलेल्या संधीमुळे महाविद्यालय क्षमता स्वत:ला सिध्द करु शकले. समन्वयक प्रा.संजय शेखावत व त्यांच्या टिमने चांगले नियोजन केले असे सांगीतले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी युवारंग २०२५ चा अहवालाचे वाचन केले. युवारंगात ११७ महाविद्यालयांचे एकुण १८०० विद्यार्थी सहभागी होते त्यात ९५० विद्यार्थिनींचा लक्षणीय समावेश होता. तदनंतर कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याकडे प्रा.अजय पाटील, प्रा. आशुतोष पाटील, प्रा.मनोज पाटील यांच्या समितीने तयार केलेला निकालाचे सिलबंद पाकीट प्रा. जयंत लेकुरवाळे यांनी सुपूर्द केले. माजी विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थी सुमीत राजपूत (एच आर पटेल औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय, शिरपूर) व विद्यार्थिनी चंचल धांडे यांनी युवारंगचे आयोजन चांगले होते. सर्व व्यवस्था चांगली होती. युवारंगातून शिकायला मिळाले अशा प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी अधिसभा सदस्य दिपक पाटील, प्रा.एस.आर.पाटील, नितीन ठाकुर, अमोल मराठे, प्रा. संदिप नेरकर, प्रा. मंदा गावीत, स्वप्नाली काळे, ऋषिकेश चित्तम, नेहा जोशी, प्राचार्य एस.एन.भारंबे, वैशाली वराडे, कविता महाजन व जिल्हा समन्वयक संजय पाटील, धिरज चव्हाण उपस्थित होते.

 

सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन व प्रा.रफीक शेख यांनी केले. आभार कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मानले.

विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता, संशोधन आणि नवोन्मेषाच्या दृष्टिकोनातून वाढ झाली आहे. ‘युवास्पार्क’ हा पुढील वर्षापासून युवा पिढीला महत्त्वाचे व्यासपीठ आणि प्रेरणा देणारा उपक्रम आहे.विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि नवोन्मेषाची भावना वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. एकूण ५० हून अधिक नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रकल्प सादर करण्यात आले होते. तज्ज्ञ समितीने सादर झालेल्या प्रकल्पांचे परीक्षण करून त्यातून सर्वोत्तम तीन प्रकल्पांना विजेते म्हणून घोषित केले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:

१) प्रथम क्रमांक: संघ सदस्य: नेत्रदीप आर. कदम, दीपांशु रहांगदळे, प्राजक्ता लंके, चैतन्य सातपुते

प्रकल्प/कल्पना: N-Phantom Stealth Coating

महाविद्यालय: युनिहर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

२) द्वितीय क्रमांक: श्री. हर्ष बी. कोटेचा

प्रकल्प/कल्पना: Eco Smart Capsule

महाविद्यालय: के.सी.ई. सोसायटीचे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव

३) तृतीय क्रमांक: श्री. सारंग डी. पाटील

प्रकल्प/कल्पना: Tech Gl Supply Chain 5.0

महाविद्यालय: के.सी.ई. सोसायटीचे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव

 

युवारंग २०२५ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-

संगीत

१) भारतीय शास्त्रीय गायन-एकल :- भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (प्रथम) युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (द्वितीय), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (तृतीय)

२) भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत – तालवाद्य-एकल – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (तृतीय)

३) भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत- स्वरवाद्य-एकल :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), एम. डी. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे (तृतीय)

४) नाट्यसंगीत-एकल :- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

५) भारतीय सुगम संगीत:- युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (प्रथम) ,भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

६) भारतीय समुहगान :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (तृतीय)

७) भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद :- महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (तृतीय)

८) पाश्चिमात्य गायन-एकल :- भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (प्रथम) , खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (तृतीय)

९) पाश्चिमात्य वाद्यसंगीत-एकल :- युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (प्रथम), जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

१०) पाश्चिमात्य समूहगान :- भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

नृत्य कलाप्रकार

१) भारतीय शास्त्रीय नृत्य :- के. सी. ई. सोसायटीचे एस. एस. मनियार लॉ कॉलेज, जळगाव (प्रथम), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिरपूर (तृतीय)

२) भारतीय लोक समूहनृत्य:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (तृतीय)

वाड्मयीन कला प्रकार

१) वक्तृत्व स्पर्धा :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर (तृतीय)

२) वादविवाद स्पर्धा :- एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफफार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर (प्रथम) , आर. सी. पटेल इंस्टिट्यूट ऑफ फॉर्मसी, शिरपूर (द्वितीय), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (तृतीय)

रंगमंचीय कला प्रकार

१) नक्कल :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (द्वितीय), जय हिंद एज्युकेशनल ट्रस्टचे झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, धुळे (तृतीय)

२) मुक अभिनय :- अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविदयालय, जळगाव (प्रथम), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), श्री. डी.एच. अग्रवाल कला, श्री. रंग अवधूत कॉमर्स आणि श्री. सी. सी. शहा आणि एम. जी. अग्रवाल सायन्स कॉलेज नवापूर, जि. नंदुरबार (तृतीय)

३) प्रहसन :- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (द्वितीय), शारदा शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे विद्याधन वाणिज्य महाविद्यालय, धुळे (तृतीय)

ललित कला

१) स्थळ चित्र:- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए.सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (द्वितीय), श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बांभोरी, जळगाव (तृतीय)

२) चिकटकला:- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)

३) पोस्टरमेकींग :- बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए.सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (प्रथम), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

४) माती कला:- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा(द्वितीय), गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (तृतीय)

५) व्यंगचित्र:- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (प्रथम), गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), डी. ई. एस. कॉलेज ऑफ एज्युकेशन, धुळे (तृतीय)

६) रांगोळी :- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविदयालय, जळगाव (तृतीय)

७) स्थळ छायाचित्र :- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (प्रथम), खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)

८) इंस्टॉलेशन :- महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (प्रथम), फार्मसी कॉलेज, शहादा (द्वितीय), आर. सी. पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिरपूर (तृतीय)

९) मेंहदी :- जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (प्रथम), श्री काकासाहेब हीरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बोदवड (तृतीय)

 

कला प्रकार निहाय सर्वसाधारण विजेते :-

१) संगीत :- भुसावळ कला, विज्ञान आणि पो. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ

२) नृत्य :- प्रताप महाविद्यालय, अमळनेर

३) वाड्मयीन कला प्रकार :- एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफफार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर

४) रंगमंचीय कला प्रकार :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

५) ललित कला :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

जिल्हा निहाय प्रोत्साहनपर फिरते चषक

जळगाव जिल्हा

प्रा. डॉ. अरविंद चौधरी, जामनेर पुरस्कृत स्व. वसुंधरा चौधरी फिरता चषक :- विद्यापीठ प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

धुळे जिल्हा

प्रा. मुक्ता महाजन, जळगाव पुरस्कृत स्व. मातोश्री शांताबाई जगन्नाथ महाजन फिरता चषक :- एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर

नंदुरबार जिल्हा

प्रा. सुनील बाबुराव कुळकर्णी, देशगव्हाणकर पुरस्कृत स्व. बाबुराव कुळकर्णी देशगव्हाणकर फिरता चषक :- गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार

 

युवारंग २०२५ सर्वसाधारण विजेते महाविद्यालय

विजेता :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव – (डॉ. जी डी. बेंडाळे स्मृतिचषक)

उपविजेता :- महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा (कै. कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृतिचषक)

 

कै. भाईसाहेब वाय. एस. महाजन मुलींची वक्तृत्व स्पर्धा

प्रथम – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

द्वितीय – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव

तृतीय – आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर

कै. शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत गायन विजेत्यांची यादी

प्रथम – डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविदयालय, जळगाव

द्वितीय – नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव

कै. ग. वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत गायन विजेत्यांची यादी

प्रथम – भुसावळ कला, विज्ञान आणि पो. ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ

द्वितीय – युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

तृतीय – महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा

कबचौउमवि बहिणाबाई करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा

प्रथम – युनिव्हर्सिटी स्कुल्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव रू. ७००१ /- रोख पारितोषिक

द्वितीय – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव रू. ५००१ /-

तृतीय – जय हिंद एज्युकेशनल ट्रस्टचे झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, धुळे रू. ३००१ /-

चतुर्थ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल कॉलेज ऑफ लॉ, धुळे रू. २००१ /-

 

 

 

दिव्यांग कला महोत्सव पारितोषिक विजेते :-

संगीत:

१) भारतीय शास्त्रीय गायन- पवन मनोज मराठे, विद्या वर्धिनी संस्थेचे डॉ. एम.वाय. वैद्य, प्रा. पी.डी. दलाल आणि डॉ. डी.एस. शहा विज्ञान महाविद्यालय,

२) भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य) – पवन मनोज मराठे, विद्या वर्धिनी संस्थेचे डॉ. एम.वाय. वैद्य, प्रा. पी.डी. दलाल आणि डॉ. डी.एस. शहा विज्ञान महाविद्यालय, धुळे

३) भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर-वाद्य)- धनंजय मुकेश पाटील, विद्या वर्धिनी संस्थेचे डॉ. एम.वाय. वैद्य, प्रा. पी.डी. दलाल आणि डॉ. डी.एस. शहा विज्ञान महाविद्यालय, धुळे

साहित्यकला: वक्तृत्व स्पर्धा –

प्रथम: वैभव सुरेश भोंबे, विद्यापीठ प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

द्वितीय: गायत्री विजय आमले, डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाले महिला महाविद्यालय, जळगाव

तृतीय: ओम रतीलाल पवार, जे. ई. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार

ललितकला: मातीकला

प्रथम: निशा ज्ञानेश्वर बारी, अ. र. भा. गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदूर्णी

द्वितीय: तन्‍मय सागर पिडियार, गजमल तुलशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार

तृतीय: सिमरन, आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर

ललितकला: व्यंगचित्र

प्रथम: गायत्री विजय आमले, डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाले महिला महाविद्यालय, जळगाव

द्वितीय: सिमरन, आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर

तृतीय: तन्‍मय सागर पिडियार, गजमल तुलशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार

संगीत: भारतीय सुगम संगीत

संगीत: भारतीय सुगम संगीत

गायत्री विजय आमले, डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाले महिला महाविद्यालय, जळगाव
=================

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम