भारतीय सेना दिनानिमित्त डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रा.डॉ.तुषार रायसिंग यांचे व्याख्यान
दक्षिण आशियातील राजकीय अस्थिरता आणि भारत" या विषयावर व्याख्यान
भारतीय सेना दिनानिमित्त डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रा.डॉ.तुषार रायसिंग यांचे व्याख्यान
दक्षिण आशियातील राजकीय अस्थिरता आणि भारत” या विषयावर व्याख्यान
जळगाव
येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग,भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना,व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सेना दिनानिमित्त वक्ते प्रा.डॉ. तुषार रायसिंग ( संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ) यांचे “दक्षिण आशियातील राजकीय अस्थिरता आणि भारत” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.व्ही.जे.पाटील होते. सुरुवातीला प्रा. करण थोरात यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून मांडली.त्यानंतर वक्ते डॉ.तुषार रायसिंग यांनी आपल्या व्याख्यानात ‘दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये असलेल्या राजकीय अस्थिरतेचे व त्याचे भारतावरील होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले. तसेच भारताशेजारील राष्ट्रांकडून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या बाह्य आक्रमणाचे धोके निर्माण झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमुळे भारताची सुरक्षितता धोक्यात आल्याचे म्हटले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ. व्ही.जे. पाटील यांनी भारतीय सेनादलांचे तसेच भारताचे सामरिक व भौगोलिक महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीपक पवार यांनी केले तर आभार रा.से. यो. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शिला राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.दिपक किनगे, प्रा. अनिल बेलसरे, प्रा.नूरी तडवी तसेच प्रा.शांताराम तायडे, एन.सी.सी. कॅडेट्स, रासेयो स्वयंसेविका व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम