भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बेंडाळे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बेंडाळे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव ;- भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभाग, इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यानंतर विद्यार्थिनींना संविधानाचे महत्व, मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत त्यांनी माहिती दिली.

महाविद्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान प्रभात फेरी काढून संविधान जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसरातील ‘संविधान सेल्फी पॉइंट’ येथे उत्साहाने सेल्फी घेतल्या. ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २९७ विद्यार्थिनींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पोस्टर स्पर्धेत विद्यार्थिनींनी संविधानातील तत्त्वे, मूल्ये आणि नागरिकांचे कर्तव्ये अधोरेखित करणारी आकर्षक व सृजनशील पोस्टर्स साकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश कोष्टी यांनी तर प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे श्री. शांताराम तायडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. हर्षाली पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, डॉ. सत्यजित साळवे, सौ. सुनिता पाटील यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागप्रमुख डॉ. दिपक किनगे, डॉ. मोनाली खाचणे, डॉ. विनोद नन्नवरे आणि प्रा. नुरी तडवी यांनी सहकार्य केले. प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीने संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम