
भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदन – छात्रभिनंदन
जळगाव – भारत विकास परिषद स्थापना दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमेनिमित्त भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे गुरुवंदन – छात्रभिनंदन तसेच शैक्षणिक साहित्याच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यात बाल विकास मंदिर, शेवंताबाई टोके प्राथमिक विद्या मंदिर, कुमुदिनी इंगळे माध्यमिक विद्यालय या शाळेतील नववी व दहावीच्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तके वाटप करण्यात आले.
तसेच गुरुवंदन – छात्रभिनंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. आणि गुरूंचा श्लोक सर्व विद्यार्थ्यांनी स्मरण केला.
गुरुप्रती आदर म्हणून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांकडून गुरूंना वंदन करण्यात आले आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या हेमांगिनी महाजन, डॉ.अनुपम दंडगव्हाळ, अनिरुद्ध कोटस्थाने, डॉ. विकास चौधरी, धनंजय खडके, डॉ. योगेश पाटील, संजीव पाटील, उमेश पाटील, उल्हास सुतार, राधिका नारखेडे, विमल खडके, संध्या पाटील, कविता कोटस्थाने, वृंदा महाजन आदी सदस्यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ३०० विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम