भीषण अपघातात बोदवडचे दोन जण ठार, ११ जखमी

नेवासा तालुक्यातील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा...

भीषण अपघातात बोदवडचे दोन जण ठार, ११ जखमी
नेवासा तालुक्यातील दुर्दैवी घटना
नेवासा प्रतिनिधी l अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी (दि. ९ जून) पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ११ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी माहिती दिली.
क्रिकेट सामना पाहून परतत होते बोदवडचे खेळाडू
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीतील १३ विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथे एमपीएल (MPL) क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपून ते क्रुझर वाहनाने बोदवडकडे परतत असताना, उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या वाहनाने समोरून जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
या धडकेत प्रथमेश तेली (रा. बोदवड) याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या वृषभ सोनवणे (रा. बोदवड) याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इतर ११ विद्यार्थी जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन ॲम्बुलन्सच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बातमी बदल करा संपूर्णपणे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम