
भुसावळचे नगरसेवक बालंबाल बचावले
ट्रकच्या धडकेत कारचे मोठे नुकसान ; पहूर येथील घटना
भुसावळचे नगरसेवक बालंबाल बचावले
ट्रकच्या धडकेत कारचे मोठे नुकसान ; पहूर येथील घटना
पहूर ;- लघुशन्का करण्यासाठी कार कडेला लावून गेलेल्या भुसावळच्या नगरसेवकांच्या कारला ट्रकने दिलेल्या दिलेल्या धडकेत कर चे मोठे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास पहूर येथे साई तोलकाट्याजवळ घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्ग लगत पहूर येथे साई तोलकाट्याजवळ उभ्या मारुती सियाज गाडीस मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात सुदैवाने जीवित आणि झाली नाही. भुसावळ येथील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक रवींद्र सपकाळे हे आपल्या मारुती सियाज गाडीने संभाजीनगर हून भुसावळ कडे येत असताना वाटेत पहुर येथे साई तोल काट्याजवळ त्यांनी आपली मारुती सियाज कार एम.एच. 19 सी जे बी 777 ही गाडी थांबवून लघुशंकेसाठी गेले असता .नेमके त्याच वेळी मागून येणाऱ्या एम.एच. 21 एक्स 7868 या ट्रकने जोरदार धडक दिली. यात मारुती सियाज गाडीचे नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम