
भुसावळच्या रिध्देशची पॅरिसमध्ये झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सुवर्ण कामगीरी
भुसावळच्या रिध्देशची पॅरिसमध्ये झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सुवर्ण कामगीरी
गोदावरी परिवारात जल्लोष तर भुसावळात जोरदार स्वागत
भुसावळ – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ आणि बालरोगतविभाग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे आणि कान नाक घसा तज्ञ डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र चि. रिध्देश बेंडाळे यांनी पॅरिसमध्ये झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सुवर्ण कामगीरी केल्याने गोदावरी परिवारात जल्लोष व्यक्त केला जात असून भुसावळात जोरदार स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (आयपीएचओ) २०२५ मध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि दोन जणांनी रौप्य पदके जिंकली आहेत. हा कार्यक्रम १८ ते २४ जुलै दरम्यान पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यात ८७ देशांतील ४१५ विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतातील सुवर्णपदक विजेत्यांमध्ये रिद्धेश अनंत बेंडाळे (भुसावळ, महाराष्ट्र) कनिष्क जैन (पुणे, महाराष्ट्र) आणि स्नेहिल झा (जबलपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आगम जिग्नेश शाह (सुरत, गुजरात) आणि रजित गुप्ता (कोटा, राजस्थान) यांनी रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक तालिकेत जपान, तैवान आणि रशियासह ५ वे स्थान प्राप्त केले आहे. या यशानंतर रिध्देशवर गोदावरी परिवारात अभिनंदनाचा वर्षाव होत असून भुसावळ येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम