
भुसावळमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूससह तरुण ताब्यात
बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; गुन्हा दाखल
भुसावळमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूससह तरुण ताब्यात
बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; गुन्हा दाखल
भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंडजवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. संशयित आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमाननगर परिसरात हिरामण उर्फ किशोर जाधव (वय ३२, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हा तरुण हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १ मार्च रोजी रात्री ९ वाजता पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि शस्त्रसाठा जप्त केला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांच्या फिर्यादीवरून हिरामण उर्फ किशोर जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम