
भुसावळला भरदिवसा एक लाख ८७ हजारांची घरफोडी
भुसावळला भरदिवसा एक लाख ८७ हजारांची घरफोडी
भुसावळः नॉर्थ कॉलनी, भुसावळ येथील रहिवासी भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे एक लाख ८७ हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी (१० जून) उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी चेतन चंद्रमणी शिंदे हे आपल्या कुटुंबासह नॉर्थ कॉलनीत राहतात व संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता आहेत. १० जून रोजी सकाळी ८ वाजता
चेतन व त्यांचे वडील कामावर गेले होते, तर आई व लहान बहीण नेहा तपासणीसाठी रेल्वे हॉस्पिटलला गेल्या होत्या. त्यांनी घराला कुलूप लावून १२ वाजता घर बंद केले होते. परंतु दुपारी दीड वाजता परत आल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर बेडरूम व किचनमधील कपाटे उघडलेले व सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसले.
चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून तीन तोळ्याचे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, एक तोळ्याचे सोन्याचे झुमके, पाच ग्रॅमचे सोन्याचे टॅप्स, चार
ग्रॅमची काळ्या मण्यांची पोत, अधां किलो चांदीचे कडे-पाटले लांबविले घटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे घरी आले व तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने व्यक्त केला आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम