
महिलेला चॉपरने धमकी ; घरात घुसून शिवीगाळ, आरोपी ताब्यात
भुसावळ : शहरातील प्रल्हाद नगर परिसरात एका विवाहित महिलेला ओळखीच्या इसमाने घरात घुसून शिवीगाळ केली आणि चॉपर काढून धमकावले. आरोपी अजिमोद्दीन रिसालोद्दीन शेख (रा. ग्रीन पार्क, भुसावळ) याने “तुझ्या नवऱ्याला बोलाव, त्याला या चॉपरने ठार मारीन” अशी धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या पतीला आणि ११२ हेल्पलाइनला फोन करून घटनेची माहिती दिली.
पोलिस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चॉपर जप्त केला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम