
भुसावळ ते जळगाव दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसला आग
भुसावळ ते जळगाव दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसला आग
जळगाव / भुसावळ : जळगावहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेस (गाडी क्रं. १२५३३) ला भादली रेल्वे स्टेशनजवळ अचानक आग लागल्याची घटना १ रोजी सकाळी घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काहिकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आग आटोक्यात आली अन् मोठा अनर्थ टळला.
प्रारंभिक माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागील डब्याजवळील वायरिंगमधून धूर निघू लागल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले. मात्र, आपत्कालीन यंत्रणा त्वरित कार्यरत केल्याने तसेच
रेल्वेचे चालक व कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे काही काळासाठी रेल्वेसेवा थांबवावी ઘટનyo लागली होती. मात्र, सध्या गाडी सुरळीतपणे पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे.
या दुर्घनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेच्या नोंदीनंतर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) व तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले होते, तर आग लागण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी घाबरून जाऊ नये व गरज असल्यास हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम