
भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीकडून गुलाबराव पाटील आणि नवलसिंगराजे पाटील यांचे आभार
भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीकडून गुलाबराव पाटील आणि नवलसिंगराजे पाटील यांचे आभार
समाजकार्यासाठी ५१ हजार रुपयांचे योगदान
भुसावळ: महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे स्विय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीला ३१ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून समाजकार्यासाठी ५१ हजार रुपयांचे रोख योगदान मिळाल्याबद्दल समितीने नवलसिंगराजे पाटील यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
या भेटीदरम्यान, नवलसिंगराजे पाटील यांनी समाजाच्या कार्याचे कौतुक केले. समितीने श्री उमाकांत पाटील यांचे चिरंजीव आणि युवा उद्योजक विवेक पाटील यांचाही सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भुसावळ दोडे गुर्जर समाज मंडळाचे डॉ. सूर्यभान पाटील, डॉ. कैलास पाटील, हरिचंद्र पाटील, धनराज पाटील, महेंद्र पाटील, विलास पाटील, उमाकांत पाटील, दीपक चव्हाण, चंद्रशेखर पाटील, शशिकांत पाटील आणि पराग पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम