भुसावळ नगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट)चे 2 नगरसेवक विजयी ; नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवकांचा सत्कार

बातमी शेअर करा...

भुसावळ नगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट)चे 2 नगरसेवक विजयी ; नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवकांचा सत्कार

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने यश संपादन केले असून पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. बबलु बऱ्हाटे आणि दिपक धांडे हे दोन्ही नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कैबिनेट मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित होते . त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत भुसावळ शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “भुसावळ शहराच्या विकासासाठी राज्य शासन सदैव पाठिशी राहील. नगरसेवकांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करावा.” यावेळी शिवसेना (शिंदे गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विजयाच्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला. निवडणुकीतील या यशामुळे भुसावळ शहरात शिवसेना (शिंदे गट) ची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम