भुसावळ येथे वाईन शॉपमध्ये पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा...

भुसावळ येथे वाईन शॉपमध्ये पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी I शहरातील मधुर वाईन शॉपमध्ये दारूचे क्वार्टर घेऊन पैसे न देता, हॉटेल व्यावसायिक पंकज घनशाम जंगले (वय ४५) यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून २२०० रुपये चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ सप्टेंबर रोजी घडली होती.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकों/विजय नेरकर, पोकों/प्रशांत सोनार, पोकॉ योगेश माळी, पोकॉ महेंद्र पाटील, पोकों/अमर अढाळे, पोकॉ/भुषन चौधरी, पोहेकॉ रवींद्र भवसार यांनी प्रथम तांत्रीक तपास करून फुटेजवरुन आरोपीचे नाव नीष्पन्न केले व त्यानंतर प्रशांत सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन सदर गुन्हयातील आरोपी आरोपींना कंडारी पीओएच कॉलनी येथून ताब्यात घेतले.
रीतीक भगवान निदाने (वय २५, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) ,मिहीर दिलीप तायडे (वय २५, रा. केशव नगर, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडून चोरी केलेल्या रकमेपैकी ७८० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम