भुसावळ येथे शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

भुसावळ येथे शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

भुसावळ – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ एम आय पी एल इंग्लिश मीडियम स्कूल च्या संयुक्त विद्यमाने हाजी इकबाल पैलवान आखाडा भुसावळ येथे मुला, मुलींच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धां उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हे माहिती इंग्लिश स्कूलचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना तेली, तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष नामदेव पैलवान, सचिव निकम पैहेलवान, हाजी नईम पैहेलवान, रेईस पैहेलवान, जमील पैहेलवान, हकीम पैहेलवान, कमाल ठेकेदार, अयुब लाला, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, आयुब लाला , सुनील चौधरी, आनंद पाठक यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू,पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी मुन्ना तेली यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत शक्तीची देवता बजरंग बली यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले., प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले., स्पर्धेचे उद्घाटक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंचे सर्व स्पर्धेत सहभागी होता म्हणून मनःपूर्वक अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झाले हाच आपला विजय आहे असे मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी मुन्ना तेली यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात माझा आवडता खेळ तर कुस्ती आहे कुस्ती लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सुद्धा खेळवली जाते कुस्तीमुळे आरोग्य निरोगी व उत्तम राहते खेळाडूनी कुठल्याही संकटाला न डगमगता त्यावरती कणखर बनवून मात करावी. मार्गदर्शन करताना सांगितले खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जयपराचे आपण पचवावा असे मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून विजय संपादन करावा आज-काल मोबाईलचे युग आहे आई सुद्धा मुलांना जेवताना मोबाईल आधी हातात देते व नंतर जेऊ घालते परंतु तुमची शिक्षकांनी तुम्हाला मैदानावरती आणून तुम्हाला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे. असे मत व्यक्त केले . स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे14 वर्षातील मुले 35 किलो वजन गट प्रथम क्रमांक तिलक गवळे, द्वितीय क्रमांक अली इस्माईल शेख, तृतीय क्रमांक मजहर खान, 38 किलो वजन गट प्रथम हनान अझहर शेख, द्वितीय ओम माळी, तृतीय सलमान कुरेशी, 41की. वजन गट प्रथम नागेश्वर माळी, द्वितीय हुजेब आरिफ शेख, तृतीय हातिम शेख तिसार, 44 किलो वजन गट प्रथम सोनी मनोज दर्शीत, 48 किलो वजन गट प्रथम तेजस बोरोले, 52 किलो वजन गट लोकेश बंकर, 57 किलो वजन गट प्रथम तेजस पवार सतरा वर्षातील मुलांच्या कुस्ती स्पर्धेत 41 किलो वजन गटात प्रथम तेजस सपकाळे, द्वितीय अशरद चौधरी, तृतीय प्रशांत पाटील, 48 किलो वजन गट प्रथम अश्फाक परवेज, 51 किलो वजन गटात प्रथम वैभव माळी, 55 किलो गटात प्रथम आदित्य सपकाळ, सात किलो वजन गटात प्रथम शेख साजिद जावेद बागवान, द्वितीय सुनील कचरे 65 किलो वजन गटात प्रथम मोहमज्या रफिक शेख, द्वितीय विराट चंदनशिवे, 80 किलो वजन गटात प्रथम शेख भाईजान रोशन तांबोळी, 92 किलो वजन गटात प्रथम रिजवान खान सलाउद्दीन, 110 किलो वजन गटात प्रथम अबुझर बागवान, 19 वर्षातील फ्रीस्टाइल प्रकारात 57 किलो वजन गटात प्रथम फिरोज खान 61 किलो वजन गटात नफीस खान 65 किलो वजन गटात प्रथम विजय गोसावी 70 किलो वजन गटात दीपक चव्हाण प्रथम, 79 किलो वयोगटात भावेश चौधरी प्रथम 92 किलो वजन गटात अंजुम परवेज प्रथम 17 वर्षातील ग्रीक रोमन प्रकारात 41 किलो वजन गटात 41 ते 45 रोशन तडवी प्रथम 48 किलो गटात प्रसाद पाटील प्रथम ५५ किलो वजनी गटात वीर जयस्वाल प्रथम 65 किलो वजन गटात कृष्णा नागरे प्रथम 71 किलो वजनी गटात दर्शन पवार प्रथम 80 किलो गटात धैर्यत जितेंद्र देवकर प्रथम 92 किलो वजनी गटात आदेश मोगल प्रथम. पंच म्हणून दिलीप संगेले, प्रशांत निकम, रईस पैहेलवान, आनंद पाठक,आयुब सर, मुकेश मोरे, आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सुनील चौधरी यांनी केले सुनील चौधरी यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम