
भुसावळ येथे ३८ वर्षीय तरुणाची आत्महत्या
भुसावळ येथे ३८ वर्षीय तरुणाची आत्महत्या
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील पीओएच कॉलनी परिसरात राहणाऱ्या नीलेश अरुण खांडवे (वय ३८) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १ जून) दुपारी उघडकीस आली. या घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी नीलेशचा मोठा भाऊ मंगेश खांडवे कामावरून घरी परतल्यानंतर आईने त्याला नीलेश झोपलेला असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने मंगेशने खिडकीतून खोलीत डोकावले असता, नीलेशने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम