भुसावळ रेल्वे विभागात दुर्दैवी घटना: तिकीट तपासकाची आत्महत्या

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडली घटना

बातमी शेअर करा...

भुसावळ रेल्वे विभागात दुर्दैवी घटना: तिकीट तपासकाची आत्महत्या

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडली घटना

भुसावळ | प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट तपासकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी रात्री ही घटना घडली असून, यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव सुमेध मेश्राम (वय ४०) असे असून, त्यांनी मालगाडीसमोर झोकून देत जीवन संपवले.

प्राथमिक माहितीनुसार, रात्री ८.३० ते ९ दरम्यान ते मूर्तिजापूर स्थानकावर कर्तव्यावर होते. याच वेळी, भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीसमोर त्यांनी अचानक झेप घेतली, आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला असून, उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासातून घरगुती तणाव हा आत्महत्येमागील संभाव्य कारण असल्याचे समोर आले आहे. मात्र, अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस चौकशी सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव हाताळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम