
भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ ;– भारतीय रेल्वेद्वारे राबविण्यात येत असलेल्या “विशेष अभियान 5.0” अंतर्गत आज भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्थानकावर करण्यात आलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेणे, प्रवासी सुविधा आणि स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून सूचना प्राप्त करणे हा होता, जेणेकरून भविष्यात रेल्वे सेवा अधिक सुसज्ज बनवता येतील.
कार्यक्रमादरम्यान भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि सुधारित सुविधांवर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, धुळे रेल्वे स्थानकाचा ‘अमृत स्टेशन योजने’ अंतर्गत आधुनिक विकास करण्यात आला असून, येथे नवीन प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, नव्याने उभारलेले प्लॅटफॉर्म शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सर्कुलेटिंग एरिया आकर्षक सौंदर्यीकरण, कोच मार्गदर्शन प्रणाली, दिशादर्शक फलक तसेच ‘एक स्टेशन एक उत्पाद’ स्टॉल अशा आधुनिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
“अमृत संवाद” कार्यक्रमात प्रवासी व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी स्थानिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य नितीन ठाकूर यांनी अमृत भारत योजनेत धुळे रेल्वे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री व तत्कालीन खासदार धुळे लोकसभा मतदारसंघ डॉ. सुभाष भामरे व रेल्वे मंत्रालयाचे मंत्रालयाचे अभिनंदन केले आणि धुळे शहराच्या रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच आगामी काळात बदललेला रेल्वे स्टेशनचा रूप हे असेच टिकून राहण्याची अपेक्षा व्यक्त करताना भविष्यात आधुनिक रेल्वे स्टेशनच्या त् मेंटेनन्स कडे पुरेशी लक्ष द्यावे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच धुळे शहरातील विद्यार्थी व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी धुळे पुणे रेल्वे सुरू करावी, तसेच धुळे मुंबई रेल्वे ची वेळ रात्रीची करण्यात यावी धुळे मुंबई रेल्वेच्या प्रवासातील अनावश्यक थांबे कमी करून प्रवासातील अनावश्यक वेळ कमी करण्यात यावा. तसेच धुळे चाळीसगाव पॅसेंजर सेवा रविवारी देखील उपलब्ध करून दयावी त्याचप्रमाणे धुळे शहराला मराठवाडा, संभाजीनगर तसेच नासिक, कसारा पर्यंत जोडणारी रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी. आणि गुरुद्वारा जवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाणपुलाची व्यवस्था करण्यात यावी कारण पलीकडे सिव्हिल हॉस्पिटल असल्याने अनेक वेळेला रेल्वे क्रॉसिंग मुळे ट्राफिक जाम होते व बऱ्याच वेळेला ॲम्बुलन्स तसेच प्रवासी अडकून राहतात या वेळी मनसेचे अजित राजपूत, भा ज पा रेल्वे आघाडी असिफ , अभिजात जोशी, विशाल स्वामी, व प्रवाशांनी त्यांच्या अडचणी मांडल्या तसेच काही उपयुक्त सूचना दिल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी प्रवाशांना आश्वासन दिले की, मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि त्या टप्प्याटप्प्याने अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
या अमृत संवाद कार्यक्रमात रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी, स्थानकप्रमुख, अन्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी उत्स्फूर्त संवाद साधून रेल्वे सेवा अधिक प्रवासी-मैत्रीपूर्ण आणि सुलभ बनवण्यासाठी मौल्यवान सूचना दिल्या

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम