भुसावळ स्थानकात तीन मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा...

भुसावळ स्थानकात तीन मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

भुसावळ : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी यांनी संयुक्तरित्या राबवलेल्या यात्री सुरक्षा ऑपरेशन अंतर्गत, मोबाईल चोरीच्या दोन प्रकरणांत तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ११ जून २०२५ रोजी करण्यात आली.

८ जून रोजी भुसावळ स्थानकावरील मुसाफिर खानामधून एका प्रवाशाची बॅग चोरीला गेली होती. तपासात सीसीटीव्ही फुटेजवरून दोन संशयितांची ओळख पटली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी संयुक्त पथकाने जुन्या नगरपालिका परिसरात शोधमोहीम राबवत दोन संशयितांना ताब्यात घेतले. संदीप पुरुषोत्तम कांबळे (वय १९, गार्ड लाईन, भुसावळ), शेख इब्राहिम शेख नूरबेग (वय ३०, मिल्लत नगर, भुसावळ) चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली. असून, त्यांनी ३९,९९९

किमतीचा ओप्पो मोबाईल फोन चोरी केल्याचे मान्य केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्टेशनवरील कॅन्टीनमध्ये एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळला. तपासात संजय प्रभाकर पानसारी (वय ५९, अहमदाबाद, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडती दरम्यान मोबाईल (१६,०००) जप्त करण्यात आला. त्याने दुपारी झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम