आरक्षित शेत जमिनीवर भू माफियांचे बेकायदेशीर प्लॉटिंगचे कारस्थान उघड

उस्मानिया पार्क भागात सुरु असलेला गैरप्रकार ;सखोल माहिती घेऊन कारवाई करणार- आयुक्त ढेरे

बातमी शेअर करा...

आरक्षित शेत जमिनीवर भू माफियांचे बेकायदेशीर प्लॉटिंगचे कारस्थान उघड

उस्मानिया पार्क भागात सुरु असलेला गैरप्रकार ;सखोल माहिती घेऊन कारवाई करणार- आयुक्त ढेरे

जळगाव / प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागातील गट नं. 347/1 या शेतजमिनीवर महापालिकेच्या शहर विकास आराखड्यानुसार ग्रीन पार्क (प्ले ग्राउंड) आरक्षण आहे. मात्र, या शेतजमिनीवर भू माफिया मयूर सुभाषचंद्र अग्रवाल आणि नदीम सलीम खाटीक यांनी बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरु असलेल्या या गैर प्रकाराची सखोल माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

बेकायदेशीर ले आऊट आधारे प्लॉटची विक्री

महिला शेत जमीन मालक सुनंदा अवधूत खडके आणि सुरेखा प्रकाश पाटील यांची दिशाभूल करून भू माफियांनी सौदे पावत्या तयार केल्याचे खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या सौदे पावत्यांच्या आधारे त्यांनी ग्रीन पार्कसाठी ( प्ले ग्राउंड) आरक्षित जमिनीवर 42 (ब) च्या तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर ले आउट तयार केले. या ले आउटवर शासकीय किंवा खासगी अभियंता व आर्किटेक्ट यांची सही व शिक्का नसल्याने ते पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. त्या कच्च्या व बेकायदेशीर ले आउटच्या आधारे सर्रासपणे प्लॉटची विक्री सुरु आहे. प्लॉट विक्री करीत असल्याचे संपूर्ण पुरावे एका सौदे पावतीसह दै, बातमीदारच्या हाती लागले आहे.

ग्रीन पार्क आरक्षण रद्द न होण्याचा नियम धाब्यावर

नगर रचना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन पार्क किंवा प्ले ग्राउंड आरक्षण कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ शकत नाही. मात्र, 7/12 उताऱ्यावर या आरक्षणाची नोंद का नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

भू माफियांना राजकीय आश्रयाचा संशय

मयूर अग्रवाल आणि नदीम खाटीक यांनी बेकायदेशीर प्लॉटिंग करत गरीब जनतेची फसवणूक केली आहे. यामागे कोणाचा राजाश्रय आहे? यावर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

या प्रकारामुळे गोरगरीब जनतेची लूट होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वरणगाव येथेही बेकायदेशीर प्लॉटविक्री

भू माफियांच्या अशाच प्रकारच्या हालचालींचे वरणगाव (ता. भुसावळ) येथील गट नं. 617/1, 2, आणि 3 मध्येही आढळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध असतानाही येथे प्लॉट विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती वाचा उद्याच्या अंकात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम