भोकर मार्गे चोपडा बस सुरू करण्याची मागणी

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा...

भोकर मार्गे चोपडा बस सुरू करण्याची मागणी

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा

जळगाव प्रतिनिधी

भोकर मार्गे चोपडा बंद केलेली बस सेवा त्वरित सुरू करण्याचे मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर हे लोक वस्तीच्या मानाने मोठे गाव असल्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची साधने कमी आहेत. त्यामुळे नेहमी येजा करणाऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून जळगावहून सुटणारी भोकर मार्गे चोपडा बस सेवा ही आधीप्रमाणेच सुरू करण्यात यावी अन्यथा महामंडळाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

या बस सेवेमुळे चोपडा आणि जळगाव येथे ये जा करणारे प्रवासी यांना सोयीची वाहतूक होणार असून भोकर मार्गे बस सुरू केल्यामुळे किमान 15 ते 20 किलोमीटरचे अंतर हे या निमित्ताने वाचणार आहे असेही भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले.

याप्रसंगी निवेदन देताना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर किरण भावसार उमेश चौधरी महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे मनीषा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम