
भोजे येथे अवैध दारू विक्रीवर धाड ; १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
भोजे येथे अवैध दारू विक्रीवर धाड ; १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पाचोरा : तालुक्यातील भोजे येथे अवैध देशी- विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या १७हजार ७७५ रुपयांची दारु जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील स.पो.नि. कल्याणी वर्मा यांना भोजे गावात एक तरुण अवैधपणे मद्य विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर स.पो.नि. वर्मा यांनी पो.हे.कॉ. काजीम देशमुख, पो.ना. दीपक अहिरे, पो.कॉ. प्रतिक गाढे, पो.कॉ. मुकेश लोकरे, पो.कॉ. विकी इंगळे यांनी भोजे येथे जावून खात्री करुन त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी भोजे येथील दीपक भिसे याच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी
एकुण १७ हजार ७७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दीपक रतन भिसे (वय ३५) याच्याविरुध्द वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागिय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. तपास पो.हे.कॉ. शांतीलाल पगारे करत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम