भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत समुपदेशन समिती, पुणे शाखेचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत समुपदेशन समिती, पुणे शाखेचे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थीती, समाजप्रबोधन उपक्रम राबवण्याचा मानस
जळगाव — भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समुपदेशन समिती, पुणे शाखेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सेंट क्रीस्पिन्स होम, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी समाजातील विविध मान्यवरांची उपस्थीती होती तसेच समाजप्रबोधन उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक श्री. ललितकुमार पाटील, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सचिव अ‍ॅड. संजय राणे, डॉ. वर्षा पाटील,सुहास चौधरी,चंद्रकांत नेमाडे, दिनकर फिरके,विनया जंगले, नम्रता भोळे, मोनिका महाजन, छाया चौधरी, पुर्वा चौधरी, डॉ. संजय झोपे, प्रतिभा राणे, डिगंबर महाजन, देवेंद्र भारंबे, देवेंद्र पाटील, डॉ .परमानंद राणे, निलेश ब—हाटे, सचिन बोरोले, जगदिश फिरके आणि तुषार कोल्हे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली या नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुणे शाखेचे प्रतिनिधी डॉ. संजय झोपे यांनी प्रास्ताविक सादर करत समुपदेशन समिती, पुणे शाखेची भूमिका, उद्दिष्टे व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.यानंतर समुपदेशन समिती, पुणे शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लग्न या विषयावर बोलू काही या कार्यशाळेबाबत सौ. प्रतिभा राणे यांनी माहिती दिली. तसेच समाजासाठी उपयुक्त ठरणार्‍या लेवा विश्वम या नियोजित ऑनलाइन डिरेक्टरीविषयी श्री. देवेंद्र भारंबे यांनी मार्गदर्शन केले. पुणे शाखेच्या आगामी समाजोपयोगी उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात आला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळा व ऑनलाइन डिरेक्टरीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शनपर भाषणे करत समाजातील समुपदेशन, विवाहपूर्व व विवाहोत्तर मार्गदर्शन, कुटुंबसंवाद व सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी पुणे शाखा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधत विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.या उद्घाटन समारंभास पुणे शाखेचे सर्व सदस्य, विविध मंडळांचे व शाखांचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम