
भोरटेक रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी प्रवाशाचा पडून मृत्यू
अमळनेर प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने अंदाजे ३५ ते ३७ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्यापूर्वी भोरटेक रेल्वे स्थानकादरम्यान उघडकीस आली. सकाळी रेल्वे ट्रॅकलगत मृतदेह आढळताच पोलिसांना माहिती देण्यात आली.
मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची उंची सुमारे १७० सें.मी., मध्यम बांधा, सावळा रंग, काळे केस, दाढी, चेहरा लांबट गोल असून दात पुढे आलेले आहेत. उजव्या हाताच्या मनगटावर गोंदलेले निशाण दिसून येते. अंगावर फिकट हिरव्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट, काळी जीन्स पॅन्ट असून गळ्यात पांढरा रुमाल होता.
प्राथमिक तपासात, हा व्यक्ती रेल्वेने प्रवास करताना रात्री कोणत्या तरी कारणाने खाली पडला असून, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम