भोरस येथे ४६ किलो गोमांस जप्त

बातमी शेअर करा...

भोरस येथे ४६ किलो गोमांस जप्त
चाळीसगाव : शहरालगतच्या भोरस बुद्रुक येथे गोमांस बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणात एकास रंगेहाथ अटक केली आहे. संशयिताकडून तब्बल ४६ किलो प्रतिबंधित गोमांस तसेच विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. भोरस येथे गोमांस विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक कुणाल फौजदार, युवराज नाईक, हवालदार विजय शिंदे, तुकाराम चव्हाण यांच्या पथकाने दोन पंचांना घेऊन संशयिताच्या घरी अचानक छापा टाकला. या वेळी केलेल्या कारवाईत संशयित सय्यद मेहमूद सय्यद मेहबूब कुरेशी (वय ४९) याच्या ताब्यातून ४६ किलो प्रतिबंधित गोमांस, कुऱ्हाड, दोन मोठे सुरे, दोन लहान सुरे असा एकूण ८ हजार ४८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून तो किती दिवसांपासून हा व्यवसाय करत होता, याबाबत चौकशी सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भोरस परिसरातील हा मांस विक्रीचा प्रकार उघडकीस आणल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम