मंगरुळच्या कु.क्रांती पाटीलने सीए परीक्षेत मिळवले यश!

बातमी शेअर करा...

मंगरुळच्या कु.क्रांती पाटीलने सीए परीक्षेत मिळवले यश

मंगरुळ ता. चोपडा, जि. जळगाव या छोट्या गावातील कु.क्रांती मनोहर पाटील(निकम) हिने सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

कु.क्रांती ही श्री.मनोहर जगन्नाथ पाटील(मनोज निकम) कृषी विभाग, प्रतापविद्या मंदिर चोपडा आणि सौ.कविता मनोहर पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, धरणगाव) यांची सुकन्या असून तिच्या कुटुंबाने सदैव शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोरावर कु.क्रांतीने हे कठीण लक्ष्य गाठले आहे.

क्रांतीला या प्रवासात प्रिया शिक्षा फाउंडेशन (Priya Shiksha Foundation) यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. या संस्थेच्या कुशल आणि प्रेरणादायी शिक्षिका *प्रिया शर्मा* यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीने आपल्या अध्ययनात सातत्य राखत उत्कृष्ट यश मिळवले.

चार्टर्ड अकाउंटंट ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर आणि टप्प्याटप्प्याने दिलेल्या परीक्षांनंतर क्रांतीने अंतिम परीक्षेत यश मिळवत “चार्टर्ड अकाउंटंट” होण्याचा मान मिळवला आहे.

तिच्या या यशामुळे मंगरुळ व चोपडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक, नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

क्रांतीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या प्रोत्साहनाला, मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या अथक मेहनतीला दिले आहे. पुढील काळात ती लेखा आणि वित्तीय क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचा मानस बाळगते.

🎉 मंगरुळ ग्रामस्थांनी आणि चोपडा तालुक्याने या प्रतिभावान युवतीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम