मंगला एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात अॅड. वर्षा बिर्‍हाडे यांचा मृत्यू

बातमी शेअर करा...

मंगला एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात अॅड. वर्षा बिर्‍हाडे यांचा मृत्यू

जळगाव, – मंगला एक्स्प्रेसच्या वेगात असतानाच उतरण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्मवर पडून गंभीर जखमी झालेल्या अॅड. वर्षा साहेबराव बिर्‍हाडे (वय ४०, रा. भोईटे नगर, जळगाव) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ३१ जुलै रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. वर्षा बिर्‍हाडे या कल्याण येथे नोटरीच्या कामासाठी गेल्या होत्या. काम आटोपून त्या परतीसाठी मंगला एक्स्प्रेसने ३१ जुलै रोजी निघाल्या होत्या. मात्र, या रेल्वेला जळगाव स्थानकावर अधिकृत थांबा नसल्याने गाडीने वेग न कमी करता पुढे जाण्याचा प्रकार नेहमीच घडतो.

जळगाव स्थानकावर गाडी काही क्षणांसाठी धीम्या गतीने जात असताना अॅड. बिर्‍हाडे यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाय घसरून त्या प्लॅटफॉर्मवर कोसळल्या. या घटनेत त्यांना डोक्याला व पाठीला गंभीर इजा झाली होती. तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सतत उपचार सुरू असतानाही, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १ ऑगस्टच्या रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वकील संघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेने पुन्हा एकदा रेल्वे गाड्यांच्या थांब्याविषयी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव स्थानकावर अनेक एक्स्प्रेस गाड्या काही क्षणांसाठीच धीम्या गतीने जातात, त्याचा गैरफायदा घेऊन प्रवासी उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात घडतात.

अॅड. वर्षा बिर्‍हाडे यांच्या पश्चात पती, मुलगी, सासूबाई असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने जळगाव वकिल संघ, नातेवाईक, आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम