मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम  मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद

बातमी शेअर करा...

मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम  मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद

अमळनेर : धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. १९) ऑक्टोबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातून तब्बल ३९ रुग्णांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २५ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांना शुक्रवार, दि. २४ रोजी सकाळी ८:०० वाजता मंगळग्रह मंदिर येथून आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. रुग्णांची तपासणी डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. गौरव तायडे (नेत्ररोग तज्ज्ञ, शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल) यांनी केली.
कॅम्पचे मुख्य संयोजक भूपेंद्र तरवाघ, प्रशांत कोळी आणि अरुण पारधी यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील आणि अनुमोदन सचिव सुरेश बाविस्कर यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, भूषण पाटील, मयूर चौधरी, नितेश बारी आणि प्रमोद पाटील, गणेश शिंपी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम