मंगळ ग्रह मंदिरात उद्या श्री तुळसी विवाह सोहळा

बातमी शेअर करा...

मंगळ ग्रह मंदिरात उद्या श्री तुळसी विवाह सोहळा

अमळनेर प्रतिनिधी

येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळ ग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेला अर्थात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून २२ मिनिटांनी तुलसी विवाह सोहळा होणार आहे. श्री मंगळ ग्रह मंदिरातील तुलसी विवाह सोहळा निमित्ताने दरवर्षी खूप भव्य प्रमाणात मोठी रोषणाई, हळदीचा व संगीताचा कार्यक्रम, सुशोभीकरण आणि हजारो भाविकांना संस्थेतर्फे स्नेहभोजन दिले जात होते. मात्र संस्थेने १० जून पासून अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेतर्फे अत्यंत समाजाभिमुख व काळाची गरज असलेला एक उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे .त्या उपक्रमांतर्गत अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना लग्न सोहळे अत्यंत साधेपणाने, पारंपरिक हिंदू संस्कृतीने करण्याबाबतची शपथ देण्यात येते. सदर शपथेत हुंडा देणार नाही- हुंडा घेणार नाही, कौटुंबिक हिंसाचार करणार नाही, कायम व्यसनमुक्त राहू, आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही यासारख्या अनेक बाबींची ही शपथ देण्यात येते .त्यामुळे संस्थेने देखील या वर्षापासून श्री तुलसी विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने मात्र पूर्णतः हिंदू व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. या निमित्ताने कोणतेही भव्य रोषणाई, सजावट ताम- झाम व स्नेहभोजन नसेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम